नमन मिडटाऊनची आग आटोक्यात, जीवितहानी नाही

June 21, 2014 7:28 PM0 commentsViews: 716

Naman Towers21 जून : मुंबईतील एल्फिन्स्टन भागात नमन मिडटाऊन इमारतीला भीषण आग लागली होती. दोन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आलीय. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आज संध्याकाळी नमन मिडटाऊनला आग लागली होती. या आगीत काहीजण अडकले होते त्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. एल्फिन्स्टन भागातीलइंडियाबुल्स 1 या इमारतीजवळच्या नमन इमारतीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्यावर आग लागली होती.

तातडीने घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले, दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. एसी ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे ही आग लागली होती. एसी ट्रान्सफार्मरमध्ये आग लागल्यानंतरही आग इमारतीत पसरली होती. आग आटोक्यात आली असून सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही मात्र यात वित्तहानीचं मोठ्याप्रमाणावर नुकसान झालंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close