सध्या राज्यात नेतृत्त्वबदल नाही -सूत्र

June 21, 2014 10:39 PM0 commentsViews: 968

Image cm_on_del_back56346_300x255.jpg21 जून : राज्यात नेतृत्वबदलाच्या हालचालींना वेग आला असून दिल्लीत भेटीगाठी सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खुर्ची शाबूत असून सध्या महाराष्ट्रात नेतृत्वबदल होणार नाही अशी माहिती विश्वसनिय सूत्रांनी आयबीएन नेटवर्कला दिलीय. येत्या 28 तारखेला मुख्यमंत्री ए.के.अँटोनी पॅनलसमोर आपली भूमिका मांडणार आहे. तसंच महाराष्ट्रात निरीक्षक पाठवणार नाही अशी माहितीही सूत्रांनी दिलीय.

गेल्या दोन दिवसांपासून नेतृत्वबदलाच्या चर्चेमुळे आपली खुर्ची वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज (शनिवारी) दिल्ली गाठली. आज संध्याकाळी पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. यावेळी सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेलही या बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज्यात नेतृत्वबदलाबाबत गंभीरपणे चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. नवं नेतृत्व कोण करणार याची चाचपणी सुरू आहे, पण मुख्यमंत्री बदलाबाबत अजून निर्णय झाला नसल्याचंही सूत्रांनी सांगितलंय.

सोनियांना भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली. तर दुपारी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते ए. के. अँटोनी यांची भेट घेतली. त्यानंतर ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही भेटले. मुख्यमंत्र्यांच्या लॉबिंगसाठी त्यांचे समर्थकही दिल्लीत तळ ठोकून आहेत. शिवाजीराव देशमुख यांच्यासह माण खटावचे अपक्ष आमदार जयकुमार गोरे, सातार्‍याचे काँग्रेस आमदार आनंदराव पाटील, सुरेश जेठलिया, शिरीष कोतवाल, शिरीष चौधरी, दीपक अत्राम, राजन भोसले दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री समर्थक जनार्दन द्विवेदी आणि मोहनप्रकाश यांची भेट घेतली. पण विशेष म्हणजे काँग्रेसचा विधानसभेचा एकही आमदार मुख्यमंत्र्यांसाठी दिल्लीत गेलेला नाहीय. मुख्यमंत्र्यांनी दुपारी आपल्या समर्थकांचीही कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये भेट घेतली. तर दुसरीकडे नारायण राणे आणि शिवाजीराव मोघे हेसुद्धा दिल्लीत आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close