रुबीनाला केला तिच्या वडिलांनी विकण्याचा प्रयत्न

April 20, 2009 11:04 AM0 commentsViews: 6

20 एप्रिल, मुंबईस्लमडॉग मिलेनियर फेम रुबीनाला तिच्या वडिलांनी विकण्याचा प्रयत्न केल्याचं स्टिंग ऑपरेशनमधून उघड झालं आहे. लंडनच्या एका वेबसाईटनं हे स्टिंग ऑपरेशन केलं आहे. रुबीनाच्या वडिलांनी तिची किंमत एक कोटी 80 लाख रुपये लावल्याचं स्टिंग ऑपरेशनमधून उघड झालं आहे. मात्र, रुबीनाच्या वडिलांनी आपल्यावर केलेल्या आरोपांचा इन्कार करत मी माझ्या मुलीला विकू तरी कशाला, असा प्रश्न मीडियाला केला.स्लमडॉग मिलेनिअरच्या यशानं भारताचं सगळ्या जगात नाव झालं. तसंच या सिनेमात काम करणार्‍या झोपडपट्टीतल्या रुबीनाला नवं आयुष्य मिळणार असं चित्र यामुळं निर्माण झालं होतं. पण आता याच रुबीनाला तिच्या वडिलांनी विकण्याचा प्रयत्न केल्याचं स्टिंग ऑपरेशनमधून उघड झालं. मुंबईत एका हॉटेलमध्ये रुबीनाच्या वडिलांनी एका व्यक्तीची भेट घेतली. या भेटीदरम्यान स्लमडॉगचे डायरेक्टर डॅनी बोएल यांनी आपल्याला सांगितल्यापेक्षा कमी पैसे दिले अशी तक्रार ते करत असताना दिसतायत. तर रुबीनाला दत्तक देण्याची तयारी दर्शवत तिच्या वडिलांनी त्याबदल्यात एक कोटी 80 लाख रुपये मागितल्याचा दावाही या स्टिंग ऑपरेशनमधून करण्यात आला आहे. दरम्यान रुबीनाच्या वडिलांनी या सर्व आरोपांचा इन्कार केलाय. पण आपण हॉटेलमध्ये जाऊन त्या माणसाची भेट घेतल्याचं मान्य केलं आहे.

close