हेच का ते ‘अच्छे दिन’, सर्वसामान्यांचा मोदी सरकारला सवाल

June 22, 2014 12:53 PM4 commentsViews: 1708

उदय जाधव, मुंबई.
22 जून :  जनतेला ‘अच्छे दिन’ दाखवण्याचं आश्वासन देणार्‍या मोदी सरकारनं महिन्याभरातच कठोर निर्णय घेतला आहे. रेल्वे तिकीट दरात 14 टक्के दरवाढ करुन सर्वसामान्यांना सरकारनं जबरदस्त धक्का दिला आहे. मुंबई लोकलचा मासिक पास तर चक्क दुपटीने महाग होणार आहे. त्यामुळे हेच का ते ‘अच्छे दिन’ असा सवाल जनताही विचारतेय.

मुंबईची लोकल म्हणजे मुंबईकरांची लाईफ लाईन. पण आता ही लाईफ लाईन दुप्पट महाग झाल्याने मुंबईकरांच्या कुटुंबाचे बजेट कोलमडलं आहे. महिना पाच हजार पगार असलेले दिनेश राऊळ हातावर पोट भरणारे मुंबईकर. कामानिमित्त त्यांना बोरिवली ते चर्चगेट असा प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी लागणारा मासिक पासचा खर्च आता दुप्पट होणार आहे. त्यामुळे ते संतप्त झालेत.

मुंबईचे डबेवाले आणि कॉलेज विद्यार्थ्यांनाही हा दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे.

रेल्वे तिकीट दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचं बजेट कोलमडलं असून यासाठीच का ‘अबकी बार मोदी सरकार’चा नारा दिला होता का? म्हणे ‘अच्छे दिन आनेवाले हे’… हेच का ते ‘अच्छे दिन’.. असा सवाल आता मोदी सरकारला विचारला जातोय. सर्वसामान्यांचा हा आक्रोश मोदी सरकारसाठी पहिला इशारा आहे एवढं नक्की.

रेल्वे मालवाहतुकीत वाढ म्हणजे वस्तूंचे भाव ही वाढणार

रेल्वे मालवाहतुकीत 6.5 टक्के वाढ करण्याच्या निर्णयामुळे अनेक वस्तूंचे भाव वाढणार. रेल्वेने वाहतूक होणार्‍या वस्तूंच्या किमती होणारी वाढ अशी आहे.

 • गहू ,तांदूळ , डाळी आणि तेल तयार करण्यासाठीच्या तेलबिया (शेंगदाणे, सोयाबीन, सूर्यफूल) याची 90 टक्क्यांपेक्षा जास्त वाहतूक रेल्वेने होते त्यामुळे 10 टक्के भाव वाढण्याची शक्यता.
 •  कोळशाची वाहतूक रेल्वे माल वाहतुकीच्या माध्यमातून होत असल्यामुळे वीज उत्पादन करणार्‍या कंपन्यांना कोळशाच्या किमती कोल इंडियाकडून दोन टक्के वाढ. वीज कंपन्यांकडून आणखी एक टक्के वाढ. असे वीज ग्राहकांकडून तीन टक्के वाढीव घेतले जातील.
 • देशातील 90 टक्के सिमेटंची वाहतूक ही रेल्वेमालवाहतुकीतून होत असते त्यामुळे सिमेंट कंपन्या प्रती 50 किलोच्या बॅग साठी 8 ते 10 रुपये वाढवण्याच्या विचारात.
 •  देशातील 44 मिलियन टन एवढे खत दरवर्षी रेल्वेच्या माध्यमातून शेतकर्‍यांपर्यंत पोहचवले जाते. खतांच्या प्रती बॅगमागे सहा ते आठ रूपये वाढवण्याची शक्यता.
 • दुसर्‍या राज्यातून रेल्वेने येणार्‍या दुधामागे प्रतिलीटर 50 पेसे ते 1 रुपया वाढणार.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Akshay Gawali

  मी स्वस्ताई साठी मोदींना मत दिलच नाही……

  भाडेवाढ होणार हे जगाच्या आटत्या तेल विहिरी ओरडून सांगत आहेत …

  मी मत दिले ते भानगडी शिवाय भाडे वाढी साठी ….

  भाडेवाढी सोबत घोटाळे ऐकून कंटाळलो होतो ….

  मी ज्या गोष्टीसाठी मोदींना मत दिले ते उघड घडते आहे..

  कुठल्याही मंत्र्याची घरची मंडळी याच्या मुळाशी नाहीत …

  मोदिनी 7 प्रकल्प कालच पास केलेत …(सगळे गावाकडची आहेत …शहरी नाहीत ) …

  हेच आम्हाला ऐकायचे होते..मंत्री वेळेवर १४ – १४ तास काम करतायत ..

  हेच आम्हाला ऐकायचे होते….
  पंतप्रधानाला स्वत: ची मत आहेत..

  हे आम्हाला बघायचं होत..

  मूर्ख बालिश पंतप्रधान किंवा बाहुला दोन्ही नको होता…

  स्वस्ताई साठी मतदान केलच नव्हत .

  …कर्तुत्व आणि धडाडी साठी केल होत… आणि ते नक्कीच सार्थकी लागतय ….

  परवाच विमानतळावर होतो ….
  स्मृती इराणीला माझ्याच सारख सामानाच्या पटटयावर उभ राहून सामानाची वाट बघताना पाहून बर वाटल…

  आम्ही मत गव्हर्नन्स साठी दिलय …

  अच्चे दिन म्हणजे फक्त स्व्स्ताई नव्हे …

  तो मूर्ख विचार फक्त कॉंग्रेस वाल्यांचा… म्हणून कोणालाही काहे ही वाटत फिरण्याचा मूर्ख णा त्यानी ६० वर्षे केला

 • Mondrahul

  Abhi to survat hai….dekho kaise desh garidb hoga aur industrialist amir……..

 • Atul Bhakta

  Lots of jokes and ridicule are being circulated esp. by the frustrated AAPtards and emasculated Congress”men” about ‘Achchhe din aane wale hain’ after the price rise.

  I think for me achchhe din is different from saste din.

  Achchhe din for me would be the day with good, reliable, motorable roads, plentiful water & electricity, discipline in the society, health and security for all, right to education and end to corruption.

  Achchhe din, to me does not mean freebies and subsidies. If that was the case India would have been the heaven on earth after 67 years of such promises, and only promises..

  With the current (almost continuous) Congress legacy, we have a majority of Indians wishing they would be better off leaving an earthly existence for a heavenly one…

  Gear up for hardships, application of law & lesser savings if you want achchhe din in the true sense.

  After all, all good things come at a price.

 • SHRIKANT

  MODI FAKT SRIMANTANACH VAR ANAR GARI BANNA NHI….?????

close