काळा पैसा लपवलेल्या भारतीयांची यादी तयार

June 22, 2014 2:39 PM0 commentsViews: 1308

Image img_76892_cartoonmoney_240x180.jpg22  जून  : स्वीस बँकेत काळा पैसा ठेवणार्‍या भारतीयांची यादी बँकेनं तयारी केली असून ही यादी त्यांनी भारत सरकारलाही दिली आहे. त्यामुळे हा काळा पैसा ठेवणार्‍यांवर सरकार काय कारवाई करणार, याकडे आता सगळ्याचं लक्ष लागला आहे.

स्विस बँकांनी खातेधारकांची यादी दिल्यास काळा पैसाप्रकरणाच्या चौकशीत महत्त्वाचा दूवा हाती येणार. संबंधितांवर कठोर कारवाई करता येणार असं SITचे अध्यक्ष जस्टिस एम. बी. शाहांनी आश्वासन दिलं आहे.

दरम्यान, स्वीस बँकेत असलेल्या परकीय पैशाबाबत भारत आता 58 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. स्वीट्झरलँडच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 2013 साली या बँकेतल्या भारतीय पैशांमध्ये 43 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close