राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे, जाधवांना बढती ?

June 23, 2014 1:03 PM0 commentsViews: 3274

jadhav and tatkare 23 जून : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या जागी कोकणातले एकेकाळचे त्यांचे विरोधक जलसंपदा मंत्री सुनील तटकरे याची निवड करण्यात आल्याचं कळतंय. पण प्रदेशाध्यक्षपदाचा त्याग केल्याच्या बदल्यात भास्कर जाधवांना बढती मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाणार असून जाधवांना मंत्रीपद देण्याची शक्यता आहे.

जाधव यांना प्रदेशाध्यक्ष केल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी विचारात घेऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय. सिंचन घोटाळ्याच्या आरोपातून तटकरे यांची सुटका झालीये असं पवारांचं म्हणणं आहे.

त्यामुळेच पवारांनी कुशल संघटक असलेल्या सुनील तटकरे यांची निवड केली. याची घोषणा बुधवारी होण्याची शक्यता आहे आणि या निमित्ताने अजित पवार गटाचं पक्षसंघटनेवर वर्चस्व राहील अशीही चर्चा सुरू झाली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close