साईबाबा देव नाहीतच !, शंकराचार्यांचं वादग्रस्त विधान

June 23, 2014 1:52 PM3 commentsViews: 5845

shankaracharya_23 जून : शिर्डीचे साईबाबा हे देव नाहीतच, त्यामुळे त्यांच्या नावे देऊळ बांधणं चुकीचं आहे असं विधान करुन द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

साईबाबांच्या नावावर बक्कळ पैसा कमावला जातोय. शिर्डी संस्थानची कमाई तर कोट्यवधीच्या घरात आहे, त्याचबरोबर साईबाबांच्या नावे बांधलेली मंदिरंही लाखो रुपये देणग्यातून कमावतात अशी मुक्ताफळं शंकराचार्यांनी उधळली.

मात्र त्यांच्या केलेलं हे विधान साईभक्तांच्या भावना दुखावू शकता. साईबाबा हे ‘हिंदू- मुस्लीम’ एकतेचंही प्रतिक मानले जातात, त्यांचे भक्तगण या टिप्पणीनं दुखावले जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हे शंकराचार्य यापूर्वी वादग्रस्त वागण्यानं चर्चेत आले होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंत्रकारांनी ‘मोदी की केजरीवाल, कोण योग्य उमेदवार?’ असा प्रश्न विचारला होता, त्यावेळी स्वरुपानंदांनी एका पत्रकाराच्या श्रीमुखात लगावली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Tushar Kakad

    shankaracharyani mafi magavi ..sai tyala maf kartil

  • Reshma

    Shankaracharyani mafi magitalich pahije tyani sai Babancha apman kela Aahe

  • ANKUR

    SAB KA MALIK EK HAI SAI BABA KI JAY

close