…तर रेल्वे रुळावरुन घसरली असती का ?, सेनेचा मोदींना सवाल

June 23, 2014 2:23 PM1 commentViews: 4547

32modi_thakare23 जून : मोदी सरकारने भरमसाठ केलेल्या दरवाढी विरोधात देशभरात जनक्षोम उसळला आहे. पण एनडीएतील मित्र पक्ष शिवसेनेनंही पुन्हा एकदा घरचा अहेर दिलाय. रेल्वे दरवाढ केली नसती तर काय रेल्वेची गाडी रुळावरुन घसरली असती का, सिंग्नल यंत्रणा कोलमडली असती का ? असा सवाल शिवसेनेनं मोदी सरकारला विचारला आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’ दैनिकाच्या अग्रलेखातून सेनेनं पुन्हा एकदा मोदी सरकारला धारेवर धरलंय. ही भाडेवाढ शेवटची ठरो, असं यात म्हटलंय.

‘अच्छे दिन आनेवाले है’ असं स्वप्न दाखवत मोदी सरकार मोठ्या बहुमताने सत्तेवर विराजमान झालं पण सत्तेवर येऊन महिनापूर्ण होत नाही तेच मोदी सरकारने सर्वसामान्यांना जोरदार झटका दिला. रेल्वेच्या दरात 14.2 टक्के तर मालवाहतुकीच्या दरात 6 टक्के वाढ करण्यात आली. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागलीय. पहिल्याच झटक्यात 14.20 टक्के इतकी वाढ केल्यामुळे जनतेनं तीव्र नाराजी व्यक्त केलीय तर विरोधी पक्षांनी दरवाढीच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. पण विरोधकच नाही तर एनडीएचा घटक पक्ष शिवसेनेनंही यावर नाराजी व्यक्त केलीय. काल रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत भाडेवाढ मागे घ्यावी अशी मागणी केली केली होती. पण आज सेनेनं आपल्या स्टाईलमध्ये मोदी सरकारच्या दरवाढीच्या समाचार ‘सामना’च्या अग्रलेखात घेतला आहे. ही भाडेवाढ शेवटची ठरो, असं यात म्हटलंय.

 

तसंच लोकांना सुविधा हव्यात व त्यासाठी त्यांच्या पैसे मोजायची तयारी आहे, पण लोकांनी पैसे मोजायचे व ते रेल्वेच्या विकासाऐवजी नेत्यांच्या विकासासाठी गडप व्हायचे हे चक्र आता तरी तुटणार आहे का? रेल्वेमंत्र्यांनी पहिल्याच फटक्यात जबरी भाडेवाढ करुन लोकांच्या अंगावरून धडाधडा गाडी नेली हा अपघात टाळता आला असता, पण जणू भाडेवाढ केली नाही तर रेल्वेची गाडी रुळावरून घसरेल, सिग्नल यंत्रणा कोलमडली असती का ? असा सवाल सेनेनं मोदी सरकारला विचारलाय.

 

तसंच विकासासाठी भाडेवाढ हे सूत्र आहे, पण प्रवासी आणि मालवाहतूक यात 20 टक्के भाडेवाढ करण्यात आली यात मिळवलेल्या हजारो कोटींच्या विनियोग नक्की कुठे झाला, विकास काय केला व सुधारणा काय केल्या याचा हिशेब रेल्वेमंत्र्यांना उद्या द्यावा लागेल. मोदी यांनी अच्छे दिन आणण्याचा वायदा केला होता त्यात स्वस्ताईचा नंबर वर होता, पण रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधांसाठी भाडेवाढीचे ओझे अंगावर घेण्याची वेळ आली आहे. हीच भाडेवाढ काँग्रेसच्या काळात झाली असती तर काँग्रेसवाल्यांना तोफेच्या तोंडी देण्याचे काम ज्यांनी करावे तेच आज संपूर्ण बहुमताचे सरकार चालवीत आहेत. काँग्रेसला घातलेल्या शिव्यांचे चिंतन सरकारने स्वगताप्रमाणे स्वत:शी करावे व वाढलेल्या भाड्याचे स्मरण ठेवून विकास व सुविधांचे काम मनापासून करावे असा टोलाही लगावण्यात आला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • kiran chawan

    modi sarkar ne sarv samanya mansacha yogya vichar kela nahi tar congress sarkhi avasth honya sathi time lagnar nahi pudhe vidhansabhechya nivadnuka ahe. jar samanya mansala tumhi jar ase achhe dhake denar asal tar jantahi tumhala vidhansabhet jor ka dhakka dhirese dyalala time lavnar nahi. jay maharashtra. jay shivsena.

close