पुणे-सोलापूर हायवेवर अपघात : 19 मजूर ठार

April 20, 2009 11:21 AM0 commentsViews: 1

20 एप्रिल, पुणे पुणे-सोलापूर हायवेवर ट्रक उलटून झालेल्या अपघातात 19 जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये 8 लहान मुलं आणि 7 महिलांचा समावेश आहे. पुणे सोलापूर-हायवेवर यवत-चौफुला दरम्यान ही अपघाताची घटना घडली आहे. ट्रकमध्ये लोखंडी सळ्या होत्या. या सळ्याच्या आघातानं मुलांचा मृत्यू झालाये. अपघातात 15 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना यवतजवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू आहेत.

close