पवार म्हणतात, 30 ते 35 ‘लवासा’ निर्माण होऊ शकतात !

June 24, 2014 4:01 PM1 commentViews: 2652

2pawar_on_lavasa24 जून : राज्यात लवासासारखे 30 ते 35 प्रकल्प विकसित होऊ शकतात अशी इच्छा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. पण असे काही प्रकल्प उभे केले तर त्याला विरोध केला जातो अशी नाराजीही पवारांनी व्यक्त केली. मुंबईत एमसीसीआए (मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड ऍग्रीकलचर)च्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

इंग्लंडमध्ये नदीलगत शहरच्या शहर वसली आहेत मग आपण असं का ? करू शकत नाही असा प्रश्न मला पडला. पण कुठलाही नवीन उपक्रम राबवताना महाराष्ट्रात विरोध केला जातो. आधी एन्रॉन आणि नंतर लवासाला प्रचंड विरोध झाला पण चार चांगली लोकसोबत आली आणि त्यातून लवासाचा जन्म झाला असंही शरद पवार म्हणाले.

पवारांच्या या वक्तव्यावर सामाजिक संघटनांनी टीका केलीय. विकासाचे प्रकल्प राबवताना फक्त उद्योगपतींचं हित लक्षात घेतलं जातं. नियमांचं उल्लंघन केलं जातं. महाराष्ट्रात पाणी टंचाई असताना नवी शहरं उभारताना कुठून पाणी आणणार असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • nil

    lavasa hi fakt shrimant lokachi ghare aahet garibache kai?

close