भावाच्या खुनात शिवसेनेचा हात – नारायण राणे

April 20, 2009 1:26 PM0 commentsViews: 3

20 एप्रिल, कणकवलीअंकुश राणे यांच्या खुनामध्ये शिवसेनेचा हात आहे, असा आरोप नारायण राणेंनी कणकवलीत पत्रकारपरिषदेत केला. त्यावेळी नारायण राणे यांनी संजय राऊत आणि वैभव नाईक यांच्यावरही अंकुश राणे यांच्या खुनाचं खापर फोडलं. कणकवलीला गुंतवून ठेवून अंकुश राणेंचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांचा खून करण्यात आला, असं राणे म्हणाले. स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय हा खून शक्यच नाही, असंही राणे म्हणाले.मुंबई- गोवा हायवेवर रविवारी संध्याकाळी कासार्डेजवळच्या झुडपामध्ये अंकुश राणेंचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असती तर अंकुश राणेंचा जीव वाचला असता, असंही ते म्हणाले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे देण्यात आला आहे. निवडणुकीच्या धामधुमीत ही घटना घडल्यामुळे या प्रकरणाभोवती संशयाचं वलय निर्माण झालंय आहे. अंकुश राणेंचा खून कोणी केला, का केला या प्रश्नांना घेऊन इथल्या परिसरात पोलिसांचा तपास सुरू आहे.

close