भरात भर, मेट्रोचाही प्रवास महागणार

June 24, 2014 5:30 PM0 commentsViews: 1225

mumbai metro24 जून : एकीकडे रेल्वे भाडेवाढीमुळे मुंबई लोकलच्या पासचे दर दुप्पट झाले आहे या दरवाढीमुळे मेटाकुटीला आलेल्या मुंबईकरांच्या दुखात आणखी भरात-भर पडलीय. अलीकडेच सुरू झालेली मेट्रोचीही भाडेवाढ होणार आहे. घाटकोपर ते अंधेरी ते वर्सोवा मार्गासाठी कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 40 रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ 10 जुलैपासून लागू होणार आहे.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने दिलेल्या मुंबई मेट्रोच्या दरवाढीच्या प्रस्तावाविरोधात राज्य सरकारने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आज हायकोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली आहेत. तसंच हायकोर्टाने मुंबई मेट्रोच्या दरांबाबत दरनिश्चिती समितीने लक्ष घालावे अशी निर्देशही केंद्र सरकारला दिले आहेत. मात्र, याचिका फेटाळल्यामुळे मेट्रोला दरवाढ वाढवण्याची मुभा मिळालीय.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने 11.4 किलोमीटरच्या वर्सोवा- अंधेरी- घाटकोपर मेट्रोची पब्लिक – प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून उभारणी केली आहे. त्यात व्हिओलिया ट्रान्सपोर्टचे 74 टक्के शेअर्स आहेत तर एमएमआरडीएचे 26 टक्के शेअर्स आहेत. राज्य सरकारचा मेट्रोचा किमान 9 ते कमाल 13 रुपयेदरम्यानच तिकीट असावे असा आग्रह होता.

मात्र, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडचा किमान 10 ते कमाल 40 रुपयांदरम्यान तिकीट दर असावेत असं म्हणणं आहे आणि आता हायकोर्टाने एमएमआरडीएची याचिका फेटाळल्यानं घाटकोपर- अंधेरी- वर्सोवा मार्गासाठी कमीत कमी 10 ते जास्तीत जास्त 40 रुपये मोजावे लागणार आहेत. स्टेशनच्या टप्प्यांनुसार ही भाववाढ लागू होईल. सध्या मेट्रोचे स्वागतमुल्य म्हणून फक्त 10 रुपयेच तिकीट दर आहे. 10 जुलैपासून ही नवी दरवाढ लागू होईल. त्यामुळे आता मेट्रोच्या गारेगार प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close