साईभक्त संतप्त, शंकराचार्यांविरोधात गुन्हा दाखल

June 24, 2014 5:58 PM1 commentViews: 1512

Dwarka Peeth Shankaracharya24 जून : शिर्डीचे साईबाबा हे देव नाहीतच, त्यामुळे त्यांच्या नावे देऊळ बांधणं चुकीचं आहे, असं विधान करुन द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरुपानंद पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांच्याविरोधात शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकराचार्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत शिर्डी ग्रामस्थांनी शंकराचार्यांचा पुतळा जाळला. साईबाबांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने संतप्त गावकर्‍यांनी ठिकठिकाणी निदर्शनं केली. स्वत: साईबाबांनी कधीच देव असण्याचा दावा केला नव्हता, पण लोकांची त्यांच्यावर देवमाणूस म्हणून श्रद्धा आहे, अशी प्रतिक्रिया साईभक्तांनी व्यक्त केली.

काल सोमवारी द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरुपानंद यांनी शिर्डीचे साईबाबा हे देव नाहीतच, त्यामुळे त्यांच्या नावे देऊळ बांधणं चुकीचं आहे, साईबाबांच्या नावावर बक्कळ पैसा कमावला जातोय आणि शिर्डी संस्थानची कमाई तर कोट्यवधीच्या घरात आहे, असं वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. त्यामुळे साईभक्तांच्या भावना दुखवल्या गेल्या आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Vikram

    what andhaa shradhha nirmulan samiti want to say about sai baba is not god?

close