मुंबई हल्ल्यात पाक लष्कराचा हात – उज्ज्वल निकम

April 20, 2009 1:25 PM0 commentsViews: 10

20 एप्रिल, मुंबई अजित मांढरे/ सुधाकर कांबळे पाक लष्करी अधिकार्‍यांनी 26 / 11 चा कट घडवून आणण्यासाठी दहशतवाद्यांना कशी मदत केली, याबाबतचे मुद्दे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज आर्थररोडच्या विशेष न्यायालयात मांडले. हे मुद्दे मांडत असताना उज्ज्वल निकम यांनी मुंबई हल्ल्याच्या कटात पाकिस्तान आणि पाक लष्कराचा हात असल्याचा दावा केला. मुंबईतील 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्याच्या सुनावणीत खटला ओपन करण्याचा भाग चालला. कसाब ,त्याचे मृत साथिदार आणि त्याचे पाकिस्तानात साथिदार यांचा गुन्ह्याच्या कटात आणि प्रत्यक्ष गुन्ह्यात कसा सहभाग होता,यावर कोर्टाचं लक्ष वेधलं. मृत झालेले दहशतवादी मोबाईल फोन द्वारे पाक मधल्या त्यांच्या साथिदारांच्या संपर्कात होते.मृत दहशतवाद्यांकडे तीन मोबाईल फोन होते.नरिमन हॉऊस मधल्या आरोपींकडे 9819464530 हा नंबर होता. हा नंबर त्यांनी तिथल्या होर्सबर्ग या ज्यू नागरिकाचा होता.ओबेराय हॉटेल मधील दहशतवाद्यांनी रिटा अगरवाल यांना ठार केलं.आणि रिटा यांचा 9820704561 हा मोबाईल नंबर वापरला.तर ताज मधील दहशतवाद्यांकडे 9910719424 हा नंबर होता. हा नंबर कराचीतला होता. त्या तीन नंबरांवरून दहशतवादी पाकस्तानातील संपर्क साधत होते.सुरुवातीला दहशतवाद्यांना 0012012531824 या नंबराहून फोन आला होता. हा नंबर कराचीचा होता. त्यानंतर दहशतवाद्यांनी पाकमधल्या साथिदारांशी दुसर्‍याच नंबर वर संपर्क साधत होते.ते नंबर 0043720880764, 0043720880767, 0043720880768 असे होते. त्यानंतर निकम यांनी या हल्ल्यात पाक लष्कराचे अधिकारी कसे सहभागी होते याची मांडणी केली.खडकसिंग नावाने याहू डॉट कॉम वर चा 10 आयपी आड्रेसेस उघडली होती.या पैकी 5 पाकिस्तानी आहेत.तर या काही आय.पी आड्रेसेस कर्नल आर.सदातुल्ला यांनी वापरली आहेत. मुख्य म्हणजे कर्नल सदातुल्ला यांनीच ही खाती उघडली होती. 27 नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांनी इंडिया टीव्ही या चॅनलला धमकीचा मेल पाठवला होता. तो डेक्कन मुजाहिद्दीन डॉट कॉम या मेल आयडी वरुन पाठवला होता. पण पुढे चौकशीत त्याचा आयपी आड्रेस खडकसिंग याच्या आयपी साखळीतीलाच होता. या वरून खडकसिंग नावाने मेल खाती उघडून त्या द्वारे पाक लष्करातील अधिकारी सदातुल्ला यांनी मतद केल्याचं सिद्ध होतंय, असं सरकारी वकिलांनी मत मांडलं.

close