राजधानी एक्स्प्रेस घसरली, 4 ठार

June 25, 2014 1:08 PM0 commentsViews: 2684

rajdhani_express25 जून : नवी दिल्लीहून आसाममधल्या दिबरुगडला जाणार्‍या राजधानी एक्स्प्रेसला बिहारमधल्या छपराजवळ अपघात झाला. या ट्रेनचं इंजिन आणि त्यामागचे सात डबे रुळावरून घसरले. यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय तर 11 जण जखमी झाले आहेत.

जखमींना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. मध्यरात्री 2.15च्या सुमाराला ही घटना घडली.इथलं बचाव आणि मदतकार्य आता पूर्ण झालं असून आता लवकरात लवकर ट्रॅक मोकळा करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

विशेष म्हणजे या अपघातस्थळापासून 60 किलोमीटर अंतरावर एका मालगाडीला अपघात झालाय. त्यामध्ये मात्र कुणी जखमी किंवा मृत झाल्याची माहिती नाही. रेल्वेतर्फे मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आलीये. गंभीर जखमींना 1 लाख तर किरकोळ जखमींना 20 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. छपराचे भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांनी घटनास्थळाला भेट दिली. तर रेल्वेमंत्री सदानंद गौडाही छपराकडे निघाले आहेत.

अपघाताची तीव्रता पाहता जीवितहानी थोडीफार का होईना कमी झाली, असं म्हणावं लागेल. याचं कारण आहे जर्मन तंत्रज्ञानाचे एलएचबी डबे. या एलएचबी डब्यांचं वैशिष्ट्य काय ?

- जर्मन तंत्रज्ञान वापरून बनवलेले एलएचबी डबे
- अपघात झाल्यावर हे डबे इतर डब्यांवर चढत नाहीत
- अपघात झाल्यावर हे डबे पूर्ण उलटे होत नाहीत
- स्टील आणि ऍल्युमिनियमने बनल्यामुळे यांचं वजन तुलनेनं कमी असतं
- एका डब्याची किंमत दीड कोटी रुपये
- हे डबे 2010 सालापासून भारतात बनवले जातात

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close