चव्हाण कार्यक्षम मुख्यमंत्री, उदयनराजे भोसलेंचा NCPला घरचा अहेर

June 25, 2014 1:20 PM0 commentsViews: 4623

udayanraje_bhosle25 जून : राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दल जाहीरपणे अनेकदा नाराजी व्यक्त केलीय, मात्र राष्ट्रवादीचे सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण हे अत्यंत कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. दोन महिन्यांवर निवडणूक आली असताना त्यांना बदलून काहीही फायदा होणार नाही, चव्हाण हे स्वच्छ प्रतिमेचे असून त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या जाव्यात असा घरचा अहेरची त्यांनी दिला.

आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक जास्त फायलींचा निपटारा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय. वैयक्तिक कामांपेक्षा जनहिताची काम करण्याकडे त्यांचा जास्त भर असतो असा टोलाही त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात लगावला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close