ज्ञानोबांच्या पालखीचं जेजुरीकडे प्रस्थान

June 25, 2014 12:07 PM0 commentsViews: 205

5mauli+palkhi_pune

25 जून : पंढरीच्या ओढीनं वारकर्‍यांनी पावलं आता भराभर वाट चालत आहेत. ज्ञानोबा माऊलींची पालखी आज जेजुरीकडे निघाली आहे. पालखी जेजुरीला आल्यावर इथं भंडार्‍याची उधळण केली जाते. माऊलींची पालखी मंगळवारी सासवड मुक्कामी होती.

सासवडमधून माऊलींचे धाकटे बंधू सोपानदेव यांच्या पालखीचं मंगळवारी सकाळी प्रस्थान झालं. प्रस्थानापूर्वी थोरले बंधू ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीकडून सोपानदेवांच्या पालखीला नैवेद्य पाठवण्यात आला होता. या नैवेद्य पुजनानंतर सोपानदेवांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close