राजधानी एक्स्प्रेसच्या अपघातावरुन गृहमंत्री-रेल्वेमंत्र्यांमध्ये मतभेद

June 25, 2014 1:15 PM0 commentsViews: 2332

rajnatha singh_sadanand_gohda25 जून : राजधानी एक्स्प्रेसला रुळाला तडा गेल्यामुळे हा अपघात झाला असावा अशी प्राथमिक माहिती रेल्वेचे अधिकार्‍यांनी दिली आहे. मात्र, हा अपघात म्हणजे घातपात आहे का यावरून चर्चा सुरू झाली आहे. रेल्वेच्या या अपघातामागे नक्षलवाद्यांचा हात असल्याची शंका रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी व्यक्त केली.

मात्र, ज्या छपराजवळ अपघात झाला, तो नक्षलग्रस्त भाग नाही, त्यामुळे नक्षलवाद्यांचा हात असण्याची शक्यता गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीच फेटाळली आहे. तर याबाबतीत आताच काही निष्कर्ष काढणं योग्य नाही असं छपराचे भाजपचे खासदार राजीव प्रताप रुडी यांनी म्हटलंय.

नवी दिल्लीहून आसाममधल्या दिबरुगडला जाणार्‍या राजधानी एक्स्प्रेसाला बिहारमधल्या छपराजवळ मध्यरात्री 2.15 च्या सुमारास अपघात झाला. या ट्रेनचं इंजिन आणि त्यामागचे सात डबे रुळावरून घसरले. यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय तर 11 जण जखमी झाले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close