घर लागलं नाही टेन्शन सोडा, पुढच्या वर्षी म्हाडाची 3,000 घरं !

June 25, 2014 4:05 PM0 commentsViews: 1701

„mahada_lottery_201425 जून : मुंबई आणि कोकण येथील म्हाडाच्या दोन हजार 641 घरांची सोडत आज सुरू आहे. 2 हजार 641 घरांसाठी 93,130 फॉर्म आली होती याचा निकाल सकाळी 10 वाजेपासून सुरू झालाय. यात पहिल्या टप्प्यात मुंबईतील घरांची सोडत निघाली असून दुसर्‍या सत्रात कोकणमधील घरांची सोडत निघणार आहे. काही जणांना लॉटरी लागल्यामुळे मुंबईत घरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

पण यंदा लॉटरी जरी लागली नसली तरी निराश होण्याची गरज नाही कारण पुढच्या वर्षी म्हाडाची 3000 घरांची स्वस्तात मस्त लॉटरी निघणार आहे. त्यातील 1000 घरं मुंबईत असणार आहेत. वसई-विरार या भागात 2000 घरं असणार आहे.

विशेष म्हणजे पुढच्या वर्षी घरांच्या किंमती 50 हजार ते 3 लाखांपर्यंत कमी करण्याचा म्हाडाचा विचार असल्याची माहिती मिळतेय. येत्या काळात आणखी 2 ते 3 हजार घरं मुंबईत उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर म्हाडाच्या 9 जमिनीवर एसआरए योजना राबवण्यात येणार आहे. यासंबंधीची माहिती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश गवई यांनी दिलीय.

म्हाडाच्या घरांची लॉटरी पाहण्यासाठी लिंक – https://lottery.mhada.gov.in/results/publishdata/M14/draw/M14.html
 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close