सलमानने केला नाशिकमध्ये समीर भुजबळ यांचा प्रचार

April 20, 2009 4:35 AM0 commentsViews: 3

20 एप्रिल राजकीय नेत्यांच्या प्रचारासाठी हल्ली स्टार्सची चलती आहे. नाशिक शहरात रविवारी खुद्द सलमान खान अशाच एका रॅलीत हजर होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारासाठी सलमान खान रविवारी नाशिकमध्ये जातीने हजर होता. एरवी प्रचारसभेत भाषण ऐकण्यसाठी गर्दी जमतेच पण स्टार सलमान खान अवतरला आहे हे ऐकल्यावर फक्त त्याला पाहण्यासाठीच गर्दी वाढली. प्रचार करताना सलमानने 'भुजबळ हे माझ्या भावासारखे आहेत. ते 100 टक्के जिंकणारच' असं म्हटलं. 'युवा राजनेत्यांमध्ये उमेद असते. त्यांना वेगळी कामं करून दाखवायची असतात', असंही सलमान म्हणाला. सलमान खान या निवडणुकीत काँग्रेसच्या काही उमेदवारांच्या प्रचारात उतरलाय. या प्रचारामुळे सलमानच्या फॅन्सचा समीरला फायदा होईल का ते पाहयचं.

close