फुटबॉलच्या मैदानावर सुटला ‘ड्रॅक्युला’ !

June 25, 2014 6:48 PM0 commentsViews: 842

SAO PAULO, BRAZIL - JUNE 19:  Luis Suarez of Uruguay celebrates scoring his team's second goal during the 2014 FIFA World Cup Brazil Group D match between Uruguay and England at Arena de Sao Paulo on June 19, 2014 in Sao Paulo, Brazil.  (Photo by Julian Finney/Getty Images)Jun 24, 2014; Natal, Rio Grande do Norte, BRAZIL; Uruguay forward Luis Suarez (9) controls the ball during the second half of their 1-0 win over Italy in a 2014 World Cup game at Estadio das Dunas. Mandatory Credit: Winslow Townson-USA TODAY Sports

26 जून : फुटबॉलच्या मैदानावर काय घडू शकतं आणि काय घडू शकत नाही याच जिवंत उदाहरण उरुग्वे आणि इटलीच्या मॅचमध्ये पाहण्यास मिळालं. त्याचं झालं असं की, ‘करो या मरो’ च्या मॅचमध्ये 80 मिनिटांपर्यंत गोलच होत नव्हता. दोन्ही टीमच्या स्टार खेळाडूंनी जीवाची बाजी लावली पण दोन्हींकडून ‘इटका जवाब पथर से’ असंच सुरू होतं.

उरुग्वेचा स्टार स्ट्रायकर लुईस सुआरेझ आणि इटलीचा खेळाडू जॉर्जियो चिल्लिनी यांच्यात बॉलवर ताबा मिळवण्यासाठी झटापट सुरू होती पण अचानक स्ट्रायकर लुईसला काय झाले काय कुणास ठाऊक याने थेट जॉर्जियो चिल्लिनीच्या खांद्याचा चावाच घेतला. फुटबॉलला काळिमा फासणारी अशी ही घटना कोट्यावधी फुटबॉल प्रेमींनी पाहिली आणि संतापही व्यक्त केला.

पण या चावर्‍या लुईसचीही ही काही पहिलीच वेळ नव्हती या अगोदरही त्याने दोन वेळा असाच पराक्रम गाजवला होता. त्याचा अशा वागण्यामुळे त्याला ‘कॅनिबल ऑफ आएक्स’ असंही म्हणतात. जानेवारी 2011 ला जेव्हा स्वॉरेझ लिव्हरपूल क्लबसोबत खेळायला लागला तेव्हा त्याच्यावर सात मॅचची बंदी होती. कारण PSV एन्डोवेनच्या मिडफिल्डर ऑटमन बक्कलला तो चावला होता. यानंतर डच पेपर्सनं त्याला मांसाहारी ही पदवी बहाल केली होती.

दुसर्‍यांदा स्वॉरेझ चावला तो 2013 मध्ये. प्रिमिअर लीग मॅचदरम्यान एप्रिल 2013 ला चेल्सीचा डिफेंडर ब्रॅनिस्लाव इव्हानोविकचा त्यानं चावा घेतला. या कृत्यासाठी त्याच्यावर 10 मॅचची बंदी घातली गेली. तर आता तिसर्‍यांदा पुन्हा एकदा त्यानं तोच प्रकार केलाय. ब्राझील वर्ल्ड कपमध्ये इटली विरुद्धच्या मॅचमध्ये इटलीचा मिडफिल्डर शिलीनीचा त्यानं चावा घेतलाय. आता यानंतर त्याच्यावर काय कारवाई होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close