नवीन चावला नवे मुख्य निवडणूक आयुक्त

April 21, 2009 6:57 AM0 commentsViews: 3

21 एप्रिल, नवी दिल्ली नवीन चावला यांनी एन.गोपालस्वामी यांच्याकडून मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. दुसर्‍या टप्प्याचं मतदान अवघ्या दोन दिवसांवर असताना नवीन चावला आता मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कामकाजाला सुरुवात करणार आहेत. काही दिवसांपूर्वी एन.गोपास्वामी यांनी चावला यांच्या हाकालपट्टीची शिफारस केली होती. चावला आणि गोपालस्वामी यांच्यातले संबंध नेहमीच तणावाचे राहिले होते. कर्नाटक आणि जम्मू कश्मीरमध्ये निवडणुकांच्या तारखा असोत किंवा सोनिया गांधीना नोटीस पाठवणं असो, या दोघांमध्ये आजवर अनेकवेळा वाद झाले होते. पण आता नवीन चावला यांच्या मनासारखं झालं आहे. ते मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत.

close