…आणि अशोक चव्हाण ‘रेलरोको’ला आलेच नाही !

June 25, 2014 9:36 PM0 commentsViews: 1198

25 जून : नांदेडमध्येही भाडेवाढीविरोधात काँग्रेसनं रेलरोको आंदोलन केलं. मात्र काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी मात्र या रेलेरोकोला दांडी मारली. एक तास रेल रोको करणार असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं होतं. पण, फक्त 10 मिनिटं तपोवन एक्स्प्रेस रोखून आंदोलन गुंडाळण्यात आलं. आपण प्रत्यक्ष सहभागी नसलो तरी आपल्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल्याचं चव्हाण म्हणाले.रेल्वे भावाढीच्या विरोधात आज कॉंग्रेसतर्फे उस्मानाबादमध्येही आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी पंढरपूर निजामाबाद रेल्वे वीस मिनिट रोखून धरली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close