राणे खूनप्रकरण : सीआयडी पथक कणकवलीत

April 21, 2009 8:51 AM0 commentsViews: 2

21 एप्रिल, कणकवली अंकुश राणे यांच्या खून प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. तपासासाठी सीआयडी पथक कणकवलीत दाखल झालं आहे. घटनास्थळाचा सीआयडी पथकांनं ताबा घेतला असून, तपासकार्य सुरू झालंय. ओरोस जिल्हा रुग्णालयानं अंकुश राणे यांचा पोस्टमार्टम अहवाल सादर केल्यामुळे त्यांचा खून झाला यावर शिक्कामार्तब झालं. अंकुश राणे यांचा मृत्यू नाक, चेहरा आणि डोकं फोडल्यानं झाला असल्याचं पोस्टमार्टम अहवालात म्हटलं आहे. अंकुश राणे यांची हत्त्या शिवसेनेनंच घडवून आणल्याचा थेट आरोप नारायण राणे यांनी केला होता. तर सेनेने त्याचा इन्कार केला. 23 तारखेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारं दुसर्‍या टप्प्यातलं मतदान पाहता कणकवली आणि परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. कोणताही गंभीर अनुचित प्रकार घडू नये याची काळजी कणकवली पोलिसांकडून घेतली जात आहेत. तर प्रत्येक एस.टी. स्टॅन्डवर जाणार्‍या येणार्‍या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे.

close