मंत्र्यांच्या उधळपट्टीला चाप, नव्या कार घेण्यास मनाई !

June 25, 2014 10:07 PM0 commentsViews: 4978

modi_sarkar_oncar25 जून : मोदी सरकारला सत्तेवर येऊन उद्या एक महिना पूर्ण होणार आहे. ‘अच्छे दिन’साठी कठोर निर्णय घ्यावे लागतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं होतं. त्याची पहिली झलकही रेल्वे भाडीवाढीतून पाहण्यास मिळाली पण मोदींनी आपल्या मंत्र्यांनाही हाच मात्रा लागू केला.

मंत्र्यांनी नव्या कार खरेदी करू नये अशा सूचना पंतप्रधान कार्यालयानं सर्व मंत्र्यांना दिल्या आहेत. यापुढे एक लाखांच्यावर कोणतीही खरेदी करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. पंतप्रधान मोदींची मंत्र्यांच्या खर्चावर करडी नजर असणार आहे. यामुळे मंत्र्यांच्या उधळपट्टीला चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त होतेय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close