भाजपच्या अध्यक्षपदी अमित शाह ?

June 26, 2014 1:10 PM0 commentsViews: 1071

346_amit shah26 जून : भाजपचे सरचिटणीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय अमित शाह यांची लवकरच भाजपच्या अध्यक्षपदी घोषणा होण्याची शक्यता आहे.

हिमाचल प्रदेशचे जे.पी.नड्डा आणि राजस्थानचे ओ.पी.माथुर याचीही नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. पण शाह या शर्यतीत पुढे असल्याचं समजतंय. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 71 जागा मिळाल्या. ही बाब शाह यांचं पारडं जड करण्यात निर्णायक ठरली आहे.

पंतप्रधान आणि पक्षाचे अध्यक्ष एकाच राज्यातून असू नये, असा भाजप आणि संघाचा आधी पवित्रा होता..पण आता ती अडचणही दूर झाल्याचं समजतंय.

याबाबत भाजपनं काँग्रेसचं धोरण अमलात आणायचं ठरवलंय. राजनाथ सिंह यांनी गृहमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण असणार यावर चर्चा सुरू होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close