भास्कर जाधवांकडे उच्च तंत्रशिक्षण खातं ?

June 26, 2014 12:37 PM0 commentsViews: 1175

f44bhaskar_jadhav26 जून : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल केले जात आहे. बुधवारी सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्षपदी शपथ घेतली. प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार झालेल्या भास्कर जाधव यांना मंत्रिमंडळात जागा देण्यात आली.

भास्कर जाधव यांनी आज सकाळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईतल्या राजभवनात हा शपथविधी झाला.

दरम्यान, जाधवांना राजेश टोपे यांच्याकडे असलेलं उच्च तंत्रशिक्षण खातं मिळण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिली. तर जलसंपदा खातं हे राजेश टोपे यांना मिळण्याची शक्यता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close