आम्ही साधू-संत नाही, आरक्षणाचा फायदा झाला तर उत्तमच -पवार

June 26, 2014 2:57 PM0 commentsViews: 3708

pawar_on_aarakshan26 जून : आरक्षणाचा फायदा निवडणुकीत झाला तर त्यात नवल नाही फायदाच आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केलंय. ते कराडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ताकाला जाऊन भांडं का लपवायचं, आता निवडणुकीला फायदा होत असेल तर आम्ही काही साधू-संतांची टोळी नाही. निवडणुकीला फायदा होत असेल तर घेणारच असंही पवार म्हणाले.

मोदी सरकारच्या कारभारावरही पवारांनी भाष्य केलंय. एक महिना हा लहान कालावधी आहे. त्याचा हिशेब करणं घाईच ठरेल. त्यांना संधी दिली पाहिजे पण एका महिन्यात जे काही लक्ष्यात आले असले तर सरकारची वृत्ती ही धरसोडीची असल्याचं पवारांनी टीका केलीय. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आणि मुस्लीम आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मराठ्यांना 16 टक्के तर मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देण्यात आलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close