रिझर्व्ह बँकेची क्रेडिट पॉलिसी जाहीर

April 21, 2009 9:07 AM0 commentsViews: 2

21 एप्रिल, मुंबई रिझर्व्ह बँकेने आपलं पतधोरण म्हणजेच क्रेडिट पॉलिसी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँकेने यावेळी सीआरआरमध्ये कोणताही बदल केलेला नाही. बँकांसाठीच्या व्याजदरांत मात्र कपात करण्यात आली आहे. बँकांना रिझर्व्ह बँकेकडून मिळणार्‍या कर्जाचा व्याजदर म्हणजेच रेपो रेट पाव टक्के कमी करून 4.7 टक्के करण्यात आलाय. तर बँका ज्या दराने रिझर्व्ह बँकेला पैसे देतात तो दर म्हणजेच रिव्हर्स रेपो रेटही पाव टक्क्यांनी कमी करत 3.25 टक्के करण्यात आला आहे. यावेळी बँकाची डिपॉझिट ग्रोथ 18 टक्के राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केलाय, तर 2010 सालासाठी महागाई दराचं चार टक्के लक्ष्य रिझर्व्ह बँकेनं ठेवलंय. कर्जाचे व्याजदर आणखी कमी करणं शक्य असल्याचं मत रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलंय.

close