बाबा, टोल पाहिजे !

June 26, 2014 4:57 PM0 commentsViews: 382

26 जून : कोल्हापूर शहरातील वादग्रस्त टोल विरोधात टोल विरोधी कृती समितीने कर्‍हाडमध्ये ठ्ठिया आंदोलन केलं. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टोल बाबत फसवणूक केल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांच्या गावी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात कोल्हापूरच्या महापौर सुनिता राऊत यांच्यासह टोल विरोधीकृती समितीचे सदस्य राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरीक सहभागी झाले होते. पोलीस प्रशासनान या आंदोलनकर्त्यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे कर्‍हाड शहराबाहेरच्या बाजारसमितीमध्ये आंदोलन करण्यात आलं. तसंच प्रीतीसंगमावर जाण्यासही आंदोलन कर्त्यांना मज्जाव करण्यात आला होता. पण कृतीसमितीच्या मागणीनुसार फक्त पाच जणांना प्रीतीसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्याची परवानगी देण्यात आली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close