पुण्यात 7 हजार औषध विक्रेत्यांनी पुकारला बेमुदत बंद

June 26, 2014 8:16 PM0 commentsViews: 1612

pune_medical26 जून : पुण्यामध्ये तब्बल सात हजार औषध विक्रेत्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे आजपासून मेडिकल स्टोअर्स बंद राहणार आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे.

पुणे मेडिकल असोसिएशनच्या वतीने बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे. या बंद मध्ये पुणे जिल्ह्यातील सात हजार मेडिकल परवानाधारक सहभागी झाले आहेत. अन्न आणि औषध विभागाच्या जाचक अटीचा विरोध करण्यासाठी आज पुण्यात अन्न आणि औषध विभागाच्या समोर निषेध आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येने औषध विक्रेते सहभागी झाले होते.

डॉक्टरांच्या प्रिसक्रिप्शन शिवाय रुग्णाना कोणतंही औषध देऊ नये अशी अट अन्न आणि औषध विभागाकडून मेडिकल चालकावर लादण्यात आली. क्रोसिन, कॉमबीफ्लॅम सारख्या सर्व साधारण गोळ्या घेण्याकरिता रूग्णांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नाही आणि ते त्यांना परवडणार देखील नाही असं मेडिकल असोसिएशनच म्हणणं आहे. रुग्णांना औषध मिळाली नाही तर ते मेडिकल चालकावर हल्ला करतात असं मेडिकल असोसिएशच्या वतीने सांगण्यात आलं. अन्न आणि औषध विभागाच्या या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात अशी मागणी मेडिकल असोसिएशनने केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close