राज्यात चढला उन्हाचा पारा

April 21, 2009 9:23 AM0 commentsViews: 1

21 एप्रिलराज्यात उन्हाचा तडाखा वाढतच चाललाय. भुसावळमध्ये 47 डिग्री सेलसियस तपमानाची नोंद झालीये. आतापर्यंत हा सगळ्यात जास्त तापमान आहे. उत्तर महाराष्ट्राच्या आणखी काही भागांकडे आपण नजर टाकली तर जळगावमध्ये 45 डिग्रीवर पारा पोहोचला आहे. मालेगावचं तपमान 40 डिग्री सेल्सिअस इतकं आहे. विदर्भातल्या अकोल्यात तपमान 44.3 डिग्री सेल्सिअसवर तर नागपूरमध्ये तापमान आहे 46 डिग्री. या वाढत्या तपमानामुळं नागरिकांचे हाल होत आहेत.

close