नवी मुंबई विमानतळाचे ‘टेक ऑफ’, प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीचा तिढा सुटला

June 26, 2014 8:28 PM0 commentsViews: 672

1navi_mumbai_airport26 जून : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमिनी देण्यास शेतकर्‍यांची संमती मिळाल्याचा दावा सिडकोनं केला आहे. त्यामुळे विमानतळाच्या मार्गातील अडथळे दूर झाल्याचं म्हटलं जातंय. विमानतळासाठी लागणार्‍या जमिनीपैकी 475 हेक्टर जमीन संपादीत करणे बाकी आहे. 9 गावांची ही जमीन आहे.

यानंतर सिडकोनं 22.5 टक्के विकसीत जमीन, राहत्या घराच्या तिप्पट क्षेत्रफळ बांधकाम करण्यास रोख मोबदला, विमानतळाच्या कंपनीत शेअर्स असं पॅकेज दिलंय. हे पॅकेज 4 गावांनी मान्य केलं होतं. मात्र 5 गावांनी विरोध सुरू ठेवला होता. अखेर सिडकोने प्रत्येक गावात जाऊन पॅकेजबाबत संपूर्ण माहिती दिल्यानंतर आता शेतकर्‍यांचा विरोध मावळत असल्याचा दावा सिडकोने केलाय.

सिडकोने प्रकल्पग्रस्तांना संमतीपत्र देण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर 8 गावांतील शेतकर्‍यांनी संमतीपत्र देण्यास सुरुवात केलीय. सध्या फक्त कोली गावातील ग्रामस्थांचा विरोध कायम आहे, तोही लवकरच मावळेल असा विश्वास सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी व्यक्त केलाय. 23 जुलैपर्यंत सिडकोकडे संमतीपत्र द्यायची आहेत. संमतीपत्र देणार्‍यांना पुष्पकनगरमध्ये भुखंड देणारी लॉटरी 15 ऑगस्टला काढण्यात काढण्यात येणार आहे

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close