किसन कथोरेंविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करा : आयोग

June 26, 2014 6:30 PM0 commentsViews: 1206

96kisan_kathar4526 जून : मुरबाडचे राष्ट्रवादीचे  आमदार किसन कथोरेंविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 2004 मध्ये अंबरनाथमधून निवडणूक लढवत असताना खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

अरुण सावंत यांनी या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवरुन निवडणूक आयोगानं हे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशात कथोरेंना यापुढे निवडणूक लढवता येणार की नाही याबद्दल कसलाच उल्लेख नाही.

2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मालमत्तेचं खोटं प्रमाणपत्र दाखल केल्याप्रकरणी त्यांच्यावर आमदारकी गमावण्याची वेळ आली . माहिती अधिकार कार्यकर्ते सावंत यांनी यासंबंधी माहिती अधिकारात माहिती मागवली होती. त्यात हा सर्व प्रकार उघड झाला.

 

याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने कथोरेंना 6 वर्षं निवडणूक लढवण्यावर बंदी घातली आहे. हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात कथोरेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण तिथं त्यांचं अपील फेटाळण्यात आलं. अरूण सावंत यांनी खटला मागे घ्यावा यासाठी कथोरेंनी अनेक प्रयत्न केले. सावंतांच्या वकिलांवर दबाव टाकला सावंत यांनी खटला मागे घ्यावा याकरता त्यांच्यावर हल्लाही करण्यात आला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close