‘चावर्‍या’ स्वॉरेझवर 9 मॅच आणि 4 महिन्यांची बंदी

June 26, 2014 8:58 PM0 commentsViews: 853

Uruguay v England: Group D - 2014 FIFA World Cup Brazil26 जून : इटलीविरुद्धच्या मॅचमधील चावर्‍या उरुग्वेचा स्टार प्लेअर ल्युई स्वॉरेझवर फिफानं कारवाई केली आहे. स्वॉरेझवर आता 9 मॅच आणि 4 महिन्यांची बंदी घातली गेली आहे. त्यामुळे स्वॉरेझचं वर्ल्ड कप ड्रीम संपुष्टात आलंय.

यानंतर तो वर्ल्ड कपमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. मंगळवारी रात्री उरुग्वे आणि इटली दरम्यान झालेल्या सामन्यात 79 व्या मिनिटाला बॉलचा ताबा मिळवण्यासाठी स्वॉरेझ आणि इटलीचा खेळाडू शिलिनी यांच्यामध्ये गोल पोस्टजवळ झटापट झाली होती.

पण वैतागलेल्या स्वॉरेझनं चक्क शिलिनीचा चावा घेतला. पहिल्यांदा हा प्रकार म्हणजे हेड बट वाटला. पण रिप्लेमध्ये स्वॉरेझनं चक्क चावा घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे उरुग्वे जरी राऊंड ऑफ 16 मध्ये गेली असली तरी यानंतर आता स्वॉरेझ खेळू शकणार नाही. स्वॉरेझने या अगोदरही दोन वेळा चावा घेण्याचा पराक्रम केला होता.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close