चेन्नई सुपर किंग्जचा सुपर विजय

April 21, 2009 9:31 AM0 commentsViews: 5

21 एप्रिल, पोर्ट एलिझाबेथ आयपीएलच्या दुसर्‍या राऊंडममध्ये महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई सुपर किंग्जनं केविन पीटरसनच्या बंगलोर रॉयल चॅलेंजर्सचा 99 रन्सनं पराभव केला आणि आयपीएलमध्ये आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. सर्वाधिक 3 विकेट घेणारा मुथय्या मुरलीधरन मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला. मॅथ्यू हेडन आणि पार्थिव पटेल यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर पहिली बॅटिंग करणार्‍या चेन्नई सुपर किंग्जनं 5 विकेट गमावत 179 रन्सचा बलाढ्य स्कोर उभा केला. हेडननं 1 सिक्स आणि 9 फोर मारत फक्त 35 बॉलमध्ये 65 रन्स केले. तर पार्थिव पटेलनं त्याला 30 रन्स करत चांगली साथ दिली. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी तब्बल 106 रन्सची पार्टनरशिप केली. यानंतर आलेल्या सुरेश रैना, महेंद्रसिंग धोणी आणि ऍन्ड्र्यू फ्लिन्टॉफनंही आक्रमक बॅटिंग करत टीमचा स्कोर 179वर नेला. बंगलोरतर्फे प्रविण कुमारनं सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. पहिल्या मॅचमधील विजयी कामगिरी कायम राखण्यात बंगलोर रॉयल चॅलेंजर्सला मात्र अपयश आलं. त्यांची पूर्ण टीम अवघ्या 87 रन्समध्ये ऑलआऊट झाली. द्रविडनं एकाकी लढत देत 20 रन्स केले. पण तो टीमचा पराभव .वाचवू शकला नाही. बंगलोरचे तब्बल 6 बॅटसमन दुहेरी रन्सही करू शकले नाहीत.चेन्नई सुपर किंग्जतर्फे मुथय्या मुरलीधरननं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर लक्ष्मीपती बालाजीनं दोन विकेट घेत त्याला चांगली साथ दिली.

close