सोनिया आणि राहुल गांधींना कोर्टाची समन्स

June 26, 2014 9:57 PM0 commentsViews: 2099

99099sonia_rahul26 जून : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना दिल्ली कोर्टाने समन्स बजावले आहे. आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणात त्यांना 7 ऑगस्टला कोर्टात हजर राहायला सांगण्यात आलंय. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ही याचिका दाखल केली होती.

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रसिद्ध करणारी असोसिएट जर्नल ही कंपनी ताब्यात घेण्यासाठी यंग इंडिया ही कंपनी स्थापन करण्यात आली. या कंपनीत सोनिया आणि राहुल गांधी यांचे 38 टक्के शेअर्स आहेत आणि या कंपनीला काँग्रेसने नियमबाह्यपणे कर्ज दिल्याचा स्वामी यांचा आरोप आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close