पाणीटंचाईग्रस्त भागात तातडीने टँकर उपलब्ध करा -मुख्यमंत्री

June 27, 2014 1:42 PM0 commentsViews: 394

cm on dabholar case27 जून : पाणीटंचाई जाणवणार्‍या परिसरात तातडीने टँकर उपलब्ध करून देण्यात यावेत असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिले आहेत. त्याचबरोबर राज्यातल्या सर्व धरणांमधलं पाणी फक्त पिण्यासाठीच वापरलं जावं असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

पाणीटंचाई आणि लांबलेल्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडून परिस्थिती जाणून घेत आहेत. त्यानुसार मदतीचं नियोजन केलं जाणार आहे.

मुख्यमंत्री आज मराठवाड्यातल्या 8, खान्देशातल्या 5, पश्चिम महाराष्ट्रातल्या 5, अमरावती विभागाच्या 2 जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत.

दरम्यान, दुष्काळाशी सामना करण्यासाठी सज्ज राहा, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय. तर दुसरीकडे मनमाडमध्ये 10 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. वाघदर्डी धरणातलं पाणी संपलंय. हा पाणीसाठा आता केवळ 5 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा आता धरणात उपलब्ध आहे. सध्या मनमाडमध्ये 25 दिवसांनी पाणीपुरवठा होतोय. आता पालखेड धरणातून 7 जुलै पासून पाणी सोडण्याचा निर्णय नाशिकच्या जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close