भटक्या कुत्र्यांचा 9 वर्षाच्या चिमुरड्यावर हल्ला

June 27, 2014 12:12 PM0 commentsViews: 939

thane_dog_biting27 जून : ठाण्यातल्या मुंब्रा इथं आठ ते दहा भटक्या कुत्र्यांनी बुधवारी सकाळी मुंब्रा येथील अमृतनगर भागात शाळेत जात असलेल्या 9 वर्षाच्या साहिद नसीम अहमद सय्यद या मुलावर हल्ला चढवून त्याचे चावे घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

साहिदच्या अंगावर कुत्र्याच्या दातांचे चारशे ते पाचशे निशाण उठले असून त्याला उपचाराकरिता मुंबईतील जे.जे.रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंब्रा-कौसा भागातील ठाणे महापालिकेच्या उर्दू माध्यम शाळेत साहिद तिसरीत शिकतो.

सकाळी शाळेत जात असताना अमृतनगर येथील एमटीएनएलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मोकळ्या मैदानातून साहिद जात असताना कुत्र्यांनी हल्ला केला. साहिदच्या डोक्यावर,कानावर,चेहर्‍यावर आणि संपूर्ण अंगावर चावे घेतले आहेत. स्थानिकांनी लगेच त्याची कुत्र्यांपासून सुटका केली. जे.जे रूग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या चेहर्‍यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close