मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात जनहित याचिका दाखल

June 27, 2014 2:30 PM0 commentsViews: 7501

566pt_marahata_Aarakshan27 जून : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतांच्या बेगमीसाठी राज्य सरकारने मराठा समाज आणि मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजाला 16 टक्के तर मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देण्यात आलं मात्र मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केलीय.

बेकायदेशीरपणे आणि चुकीच्या पद्धतीने मराठा आरक्षण देण्यात आल्याचं केतन तिरोडकर यांचं म्हणणं आहे. दोन दिवसांपुर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाला मंजुरी देण्यात आली.मराठा समाजाला 16 टक्के तर मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय.

आरक्षणाचं प्रकरण कोर्टात गेल्यास-कायदेशीर बाबींना तोंड देण्यास राज्य सरकार तयार असल्याचं त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं होतं. सध्या राज्यात 52 टक्के आरक्षण आहे. मराठा आणि मुस्लीम आरक्षण धरुन 73 टक्के आरक्षण झालं आहे. त्यामुळे मराठा समाजाला दिलेलं 16 टक्के आरक्षण कोर्टासमोर टिकणार का हा सर्वात मोठ्ठा प्रश्न आहे. कारण आर्थिकदृष्ट्या मागासलेपणाच्या मुद्दयावर हे आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे राज्य सरकारची कोर्टात खरी कसोटी लागणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close