सीएसटी स्टेशनच्या प्रशासकीय इमारतीची आग आटोक्यात

June 27, 2014 6:39 PM0 commentsViews: 1065

cst_station_fire27 जून : मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनल्सच्या प्रशासकीय इमारतीला संध्याकाळी पाचच्या सुमारास भीषण आग लागली. या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागली.  सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सीएसटी रेल्वे स्टेशनच्या समोरच असलेल्या या इमारतीला लागलेल्या आगीमुळे एकच गोंधळ उडाला होता. पाचव्या मजल्या लागलेल्या आगीमुळे धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत होते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखलं झाल्यात. तासाभरात या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिली. पण ही कशामुळे लागली हे मात्र अजून स्पष्ट होऊ शकलं नाही.

अपडेट

– सीएसटी स्टेशनवरची आग नियंत्रणात
– तात्पुराता बंद केलेला प्लॅटफॉर्म नंबर 1 ही सुरू केला
– आगीमागचं कारण अद्याप अस्पष्ट
– आगीमुळे गाड्या 10 ते 12 मिनिटं उशिरानं
– वडाळा ते सीएसटीच्या 3 गाड्या रद्द

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close