औषध विक्रेत्यांचा बंद चिघळला, राज्यभर बंदचा इशारा

June 27, 2014 5:34 PM0 commentsViews: 986

33pune_medical27 जून : अन्न आणि औषध प्रशासनातर्फे औषधे विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याच्या कारवाईविरोधात पुणे केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे गुरुवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आलाय. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अटी जाचक असल्याचं सांगत हा संप पुकारला गेलाय. कारवाई करताना आधी कसलीच माहिती न देता जागेवरच परवाने रद्द करण्यात येत आहेत, शासनानं या विषयी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा महाराष्ट्रभर हे आंदोलन केलं जाईल असा इशारा या संघटनेनं दिला आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या या अटींवर मुख्य आक्षेप

– औषधे विकताना दुकानात फार्मसीची पदवी घेतलेला फार्मासिस्ट हवा
– डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं विकू नयेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close