पुण्यात औषध विक्रेत्यांचा संप अखेर मागे

June 28, 2014 12:15 PM0 commentsViews: 495

pune_medical28 जून : पुण्यात गेले चार दिवस सुरू असलेला औषध विक्रेत्यांचा संप मागे घेण्यात आलाय. यामुळे आता मेडिकलची दुकानं पुन्हा उघडली आहेत. आमच्या मागण्या अन्न आणि औषध प्रशासनानं मान्य केल्याचा दावा केमिस्ट असोसिएशननी केलाय.

प्रशासन आणि केमिस्ट असोसिएशनच्या वादात खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यस्ती केल्याचं समजतंय. प्रशासनाचे जाचक नियम मागे घेण्यात यावेत आणि ज्या 300 केमिस्टवर कारवाई झालीय, ती कारवाईही रद्द झाली पाहिजे अशा केमिस्ट असोसिएशनच्या मागण्या होत्या.

दोन दिवसांच्या संपानंतर अखेर औषध विक्रेत्यांनी संप मागे घेतल्यामुळे पुणेकरांचा जीव भांड्यात पडलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close