मीडियापासून दूर राहा, मोदींचा खासदारांना सल्ला

June 28, 2014 1:30 PM0 commentsViews: 2666

280614 modi_in_faridabad28 जून : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या नवर्निर्वाचित खासदारांचं दोन दिवसांचं प्रशिक्षण शिबिर फरिदाबादमधील सूरजकुंडमध्ये आजपासून सुरू झालंय. या अधिवेशनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. मोदींनी खासदारांना मार्गदर्शन केलं. माध्यमांपासून दूर राहा असा अजब सल्लाच मोदींनी आपल्या खासदारांना दिला.

तसंच मीही तुमच्यासारखा पहिल्यांदाच खासदार झालोय. पंतप्रधान कार्यालयात मी, पण बरंच काही शिकतोय. आपला आचार, विचार आणि व्यवहार चांगला असला पाहिजे. लोकांना आपल्यांकडून खूप अपेक्षा आहे. त्यामुळे सरकारच्या योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवा. काही अडचण असल्यास थेट माझ्याशी थेट बोला असा सल्लाही मोदींनी दिला.

त्याचबरोबर संसदेतल्या चर्चेत सामिल होण्यापूर्वी त्या विषयाचा नीट अभ्यास करा अशी तंबीही मोदींनी दिली. दोन दिवस चालणार्‍या या अधिवेशनात खासदारांना संसदेतील कामकाज, त्यातील कामं ,संसदेत कुठला प्रश्न कशाप्रकारे मांडावा,संसदेतील शिस्तीचे पालन कसं करावं यावर ज्येष्ठ भाजप नेत्यांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. रविवारी संध्याकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या भाषणाने या अधिवेशनाचा समारोप होणार आहे.

मोदींचा सल्ला

  • - आचार, विचार आणि व्यवहार चांगला असावा
  • - माध्यमांपासून दूर रहा
  • - सरकारच्या योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवा
  • - गरज असेल तेव्हा माझ्याशी थेट बोला
  • - संसदेतल्या चर्चेत सामिल होण्यापूर्वी त्या विषयाचा नीट अभ्यास करा
  • - आपण लोकसभेत काँग्रेसचा पराभव केलाय. त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकांमध्ये घडवून आणायची आहे
  • - आपल्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करा

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close