नितीन आगे खून प्रकरणाला दोन महिने पूर्ण

June 28, 2014 12:01 PM0 commentsViews: 354

nitin_aage28 जून : राज्यभर खळबळ माजलेल्या नितीन आगेच्या खुन प्रकरणाला आज दोन महिने पूर्ण होत आहेत. पण दोन महिने उलटूनही आगे कुटुंबीय न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. आतापर्यंत डझनभर राजकीय नेत्यांनी त्याच्या आगेंच्या घरी हजेरी लावली.

पण तपासातल्या मुलभूत गोष्टींसाठी नितीनच्या वडिलांची पायपीट काही टळली नाही. अहमदनगरमधील खर्डा या गावात 28 एप्रिलला नितीन आगेची प्रेमसंबंधातून निर्घुण हत्या करण्यात आली होती.

सवर्ण मुलीसोबतच्या प्रेमसंबंधातून नितीनची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर राज्यातील अनेक सामाजिक संघटनांनी या हत्येविरोधात आवाज उठवला होता.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close