जमीन मालकी हक्क प्रकरणी सुरेश वाडकरांना अटकपूर्व जामीन मंजूर

June 28, 2014 12:30 PM0 commentsViews: 834

suresh_wadkar_28 जून : नाशिक इथं जमीन मालकी हक्क प्रकरणी सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना 1 जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झालाय. आवश्यकतेनुसार तपास अधिकार्‍यांसमोर हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

कोर्टाच्या परवानगीशिवाय वाडकरांना परदेशीही जाता येणार नाहीय. हेमंत कोठीकर यांनी वाडकरांवर फसवणुकीचा आरोप केलाय. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणात गुन्हाही दाखल झालाय. 1 जुलैला आता या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close