अशोकराव आणि विलासरावांमध्ये शीतयुद्ध सुरूच

April 21, 2009 1:20 PM0 commentsViews: 5

21 एप्रिल, लातूर सध्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यातला वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. जयंत आवळे यांच्यासाठी पंतप्रधान मनमोहनसिंग लातूरमध्ये आज प्रचारसभा घेत होते. त्या प्रचारसभेला मुख्यमंत्री अशोक चव्हाण अनुपस्थित राहिल्यामुळे माजी आणि आजी सीएम यांच्यातलं शीतयुद्ध समोर आलं आहे. विलासरावांची मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे ते अशोक चव्हाण यांच्यावर नाराज होते. मराठवाड्यातला महसूल वसुल करणा-या लातूर कार्यालयाचं विभाजन करून नांदेडमध्ये नव्या कार्यालयाची स्थापना करण्याच्या निर्णयामुळेही विलासरावांना अशोकरावांवर काहीसे नाखुश होते. त्यात अशोक चव्हाण यांनी आज लातूरमधल्या पंतप्रधानांच्या सभेस कामात गुंतलेला असल्याचं कारण सांगून हजर राहणं चतुराईनं टाळलं आहे. तसंच जर अशोकराव चव्हाण आजच्या लातूरच्या सभेला हजर राहिले असते तर माजी मुख्यमंत्र्यांच्या गावात पीएम आणि सीएम यांची उपस्थिती म्हणत विलासरावांचं महत्त्व वाढलं असतं. पण तसं आजी मुख्यमंत्र्यांना होऊ दिलं नाही. त्याचप्रमाणे नांदेडमध्ये झालेल्या सभेला विलासराव देशमुख गेले नव्हते. त्यामुळे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यातला वाद चिघळण्याची शक्यता आहे.

close