राखी सावंतचा आरपीआयमध्ये प्रवेश

June 28, 2014 5:26 PM1 commentViews: 5960

 rakhi_sawant_in_rpi28 जून : लोकसभा निवडणुकीत लाजिरवाण्या पराभवातून सावरलेल्या अभिनेत्री राखी सावंतने आता पुन्हा नव्याने सुरुवात केलीय. राखी सावंतने आज आरपीआयमध्ये प्रवेश केलाय. गेल्या काही दिवसांपासून याबद्दल चर्चा सुरू होती.

अखेर आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत एका छोटेखानी कार्यक्रमात राखीने आरपीआयमध्ये प्रवेश केलाय. राखी सावंतच हा प्रवेश काही सुद्धा राहिला नाही. आरपीआयमध्ये एंट्री करताच तिच्याकडे आरपीआयच्या महाराष्ट्र प्रदेशचं उपाध्यक्षपद तसंच पक्षाच्या महिला आघाडीचं कार्याध्यक्षपद सोपवण्यात आलंय.

दलितांची सेवा करण्याच्या उद्देशाने मी राजकारणात सक्रिय झालेय आणि त्यासाठी मला रिपब्लिकन पक्षासारखं मोठं व्यासपीठ उपलब्ध झालंय अशी प्रतिक्रिया यावेळी राखी सावंत हिने दिली.

लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबईमधून राखी निवडणुकीला उभी राहिली होती. राष्ट्रीय आम पार्टीकडून तिने निवडणूक लढवली होती. पण डिपॉझिट जप्त होईल असा लाजिरवाणा पराभव राखीचा झाला. आता राज्यात विधानभेचे वारे वाहण्यास सुरुवात झाली याचाच वेध घेत राखीने जुन्या पक्षातून बाहेर पडत रिपाइंमध्ये प्रवेश केला आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • rahulil.com

    hila vidhansabhech ticket dila tar yuti chi ek jaga padlich mhanunn samjha

close