गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक, सेनेचा नवा नारा

June 28, 2014 5:22 PM0 commentsViews: 1082

sena_gondiaya28 जून : गोंदिया शहरात आज शिवसेनेचा वचनबद्ध मेळावा पार पडला. गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक असा नारा देत शिवसेनेला घराघरात पोहोचवा असं आवाहन यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यात जातीचं राजकारण करत आहे असा आरोपही उद्धव यांनी केला. तर सध्या राज्यात जी पोलीस भरती सुरू आहे, ती अमानुष आहे, असी टीका करत उद्धव ठाकरेंनी गृहमंत्री आर.आर.पाटील यांना लक्ष केलं.

पोलीस भरतीत 5 जणांचा निष्पापांचा बळी गेले. भर उन्हात भरती घेतली जाते आणि पोलीस झाल्यावर वेळेवर पगार सुद्धा दिला जात नाही असं उद्धव म्हणाले.

दरम्यान, गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत सेना ही जागा हरली. यावेळी भाजपकडून ह्या जागेसाठीची मागणी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा ठरू शकतो.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close