अब्बास काझमी यांना हवीय चार आठवड्यांची मुदत

April 21, 2009 3:46 PM0 commentsViews: 4

21 एप्रिल, मुंबई 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख आरोपी मोहम्मद अजमल कसाबचे वकील अब्बास काझमी यांनी आज कोर्टात केसचा अभ्यास करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत मागून घेतली आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यातला आजचा सहावा दिवस होता. मुंबईत 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्याच्या सुनावणीत आज अर्जांचा दिवस होता. सरकारी पक्ष तसंच सर्व आरोपींच्या वकिलांनी आज कोर्टाकडे वेगवेगळ्या मुद्यांबाबत अर्ज केले. यात सगळ्यात महत्वाचा अर्ज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा होता. उज्ज्वल निकम यांनी कसाबचं वय निश्चित करणारी टेस्ट केली जावी आणि तसे आदेशही द्यावेत असं त्यांच्या अर्जात म्हटलं आहे.

close